गुरुवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे : वंचित - डाव्या आघाडीचे आवाहन
schedule22 Jul 26 person by visibility 33 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाटीमाराच्या निषेध्घर्थ वंचित बहुजन आघाडी, डावी आघाडी व समविचारी पक्षातर्फे गुरुवारी, २३ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. कोल्हापूरकरांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जनार्दन गायकवाड, अरुण सोनवणे, डाव्या चळवळीचे अतुल दिघे, रघुनाथ कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली. सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू समाधी स्थळ येथ्न मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. गुरुवारचा बंद हा शांततापूर्ण, लोकशाही व संविधानिक मार्गाने होणार आहे. राजर्षी शाहू समाधीस्थळ येथून मोटारसायकल रॅलीला प्रारंभ होईल. ही रॅली दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, एस.टी.स्टॅन्ड परिसर, राजारामपुरी, बागल चौक, उमा टॉकीज चौक, ते दसरा चौक अशी निघणार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुन नागरिकांनी या बंदमध्ये सहभागे व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. कॉम्रेड सतीश कांबळे यांनी गुरुवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष व काँग्रेस पक्षानेही सहभागी व्हावे यासाठी नेतेमंडळीशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला दिपक कांबळे, संजय गुदगे, सुवर्णा तळेकर, संजय गावडे, दिलीप लोखंडे आदी उपस्थित होते. दरम्यान वंचित बहुजन आघाडी व डाव्या आघाडीतर्फे गुरुवारी काढण्यात येणाऱ्या मोटार सायकल रॅलीला पोलिस प्रशासानने परवानगी नाकारली आहे. तर आमचे आंदोलन हे लोकशाही मार्गाने आहे. मोटारसायकल रॅली काढणार असे वंचित व डाव्या आघाडीने म्हटले आहे.