Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ढढ जथथकाळजी घ्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा, कोरोनाला प्रतिबंध करा – कार्तिकेयन एसतंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास पाटील यांचे निधनकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डीवाय पाटील हॉस्पिटलचा सन्मानमनसे कोल्हापूर शाखेतर्फे रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे प्रदानगोकुळचे लक्ष म्हैस दुधाच्या बाजारपेठेवर, दूध उत्पादन  वाढीसाठी राबविणार विविध योजनापंचशील हॉटेल चौकात युवासेनेचे अनोखे आंदोलन, वाहतूक शाखेला निवेदनजोडधंद्याशिवाय शिक्षक नाही, भ्रष्टाचाराशिवाय अधिकारी नाही-राजन गवससंजय घोडावत इन्स्टिट्यूटला बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५ पुरस्कारजनता आमच्यासोबत, कोणी गेले -आले तर फरक पडत नाही : सतेज पाटील

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटला बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५ पुरस्कार

schedule14 Jun 25 person by visibility 38 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे या नामवंत संस्थेला एक मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. नवभारत एज्युकेशन समिट २०२५ मध्ये संस्थेला "बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर" हा मानाचा मानला जाणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मंत्री आशिष शेलार आणि उत्तर प्रदेश राज्याचे मंत्री आशिष सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी  पुरस्कार स्वीकारला आहे. "पुरस्कार स्वीकारताना इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. गिरी म्हणाले  सर्व विभागाचे विभागप्रमुख, सर्व विषयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अविरत परिश्रम आणि एकसंघ प्रयत्न आहेत. संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, स्टार्टअप्ससाठी पोषक वातावरण, आणि नवनवीन प्रयोगशील उपक्रमांची रचना करून दिली आहे. म्हणून हे इन्स्टिट्यूट आदर्श शिक्षणसंस्था म्हणून स्थान निर्माण करत आहे.” संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन  संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले,  यांनी या पुरस्काराबद्दल  सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, भविष्यात आणखी उच्च शिखरे गाठण्याचा शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes