Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भालकर्स पुरस्कार सोहळ्यात कला वैभव जपण्याचा ध्यास‌ !कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे मंगळवारी कार्यशाळाकाळजी घ्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा, कोरोनाला प्रतिबंध करा – कार्तिकेयन एसतंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास पाटील यांचे निधनकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डीवाय पाटील हॉस्पिटलचा सन्मानमनसे कोल्हापूर शाखेतर्फे रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे प्रदानगोकुळचे लक्ष म्हैस दुधाच्या बाजारपेठेवर, दूध उत्पादन  वाढीसाठी राबविणार विविध योजनापंचशील हॉटेल चौकात युवासेनेचे अनोखे आंदोलन, वाहतूक शाखेला निवेदनजोडधंद्याशिवाय शिक्षक नाही, भ्रष्टाचाराशिवाय अधिकारी नाही-राजन गवससंजय घोडावत इन्स्टिट्यूटला बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५ पुरस्कार

जाहिरात

 

काळजी घ्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा, कोरोनाला प्रतिबंध करा – कार्तिकेयन एस

schedule15 Jun 25 person by visibility 105 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोरोनाला घाबरुन न जाता योग्य काळजी घेत प्रतिबंध करा.  मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि नियमितपणे हात धुणे या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून विषाणूचा प्रसार नियंत्रणात राहील. असे  आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या दालनात कोरोनाबाबत नियोजन व आढावा सभा झाली. जिल्ह्यात आज पर्यत एकूण 30 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार रुग्णांवर उपचार सुरू आहे. २२  रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. लसीकरण पूर्ण झाल्यामुळे या रुग्णांमध्ये रोग लक्षणांची तीव्रता कमी प्रमाणात दिसून येत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून, कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी शांत राहावे, घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, वैदयकीय अधिक्षक डॉ.रविंद्र मदने, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.सुशांत रेवडेकर, जिल्हा साथरोगतज्ञ डॉ.संतोष तावशी उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes