पंचशील हॉटेल चौकात युवासेनेचे अनोखे आंदोलन, वाहतूक शाखेला निवेदन
schedule14 Jun 25 person by visibility 35 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवाजी पार्क परिसरातील पंचशील हॉटेल चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असणारी वाहनांची ये जा असते. एसटी बसेस तसेच केएमटी बसेस तसेच अन्य अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात याच्या विरोधात आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार युवा सेनेने आक्रमक पवित्रा घेत येथून वळण घेणाऱ्या वाहनांना ताराराणी चौकाकडे पाठवत तिथून वळण घेऊन येण्यास भाग पाडले. बंद करा बंद करा जीवघेणी वळणे बंद करा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. युवा सेनेचे कोल्हापूर शहर सरचिटणीस विपुल भंडारे यांच्या पुढाकारातून झालेल्या आंदोलनानंतर सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्याशी या बाबतीत भेट घेऊन चर्चा केली. शिष्टमंडळात युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अविनाश कामते, शहर प्रमुख पियुष चव्हाण, शिवसेनेचे रुपेश इंगवले, शैलेश साळोखे, सरचिटणीस दादू शिंदे, तेजस्विनी घाटगे, वल्लारी वाले, सौरभ कुलकर्णी, मंगेश चितारे, अभिषेक ढेरे, विनायक मंडलिक, आफान बागवान, समरजित मोहिते,वैष्णव गवळी ,आदित्य शिंदे ,रत्नदीप शिंदे ,वैभव माने , सुमित मधाळे आदी उपस्थित होते.