Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाडमहापालिका निवडणूक - राजकारणातून मला बदनाम करण्याचा घाट - सुशांत पोवारसचिन शिरगावकर यांना उद्योगरत्न पुरस्कार, डॉ. आनंद देशपांडेंच्या हस्ते गुरुवारी वितरण समारंभकोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडे

जाहिरात

 

उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्र

schedule19 Aug 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  उद्योगविश्वात झपाट्याने होत असलेले बदल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सातत्याने नवे ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करावीत, नावीन्यपूर्ण विचार करावा आणि बदलत्या गरजांशी जुळवून घ्यावे, असा सल्ला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष तथा मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्यांचे व्यवसाय नवकल्पना व उद्योग सल्लागार  शंकर नारायणन विश्वनाथन यांनी दिला.

तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथे कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम विभागाच्या वतीने विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आजच्या जगातील व्यावसायिक नवकल्पना आणि उद्योगविश्वाची दृष्टी’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 विश्वनाथन यांनी आधुनिक तंत्रज्ञानातील बदल, व्यवसायातील नवकल्पना, उद्योग क्षेत्राच्या बदलत्या अपेक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील संधी याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून समस्या सोडविण्याची क्षमता, नावीन्यपूर्ण विचार, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती या बाबी व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधी, प्रशिक्षण, उद्योगाभिमुख प्रकल्प तसेच टीसीएसमधील रोजगाराच्या विविध संधींबाबत प्रश्न विचारले. उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा समजून घेण्याबरोबरच भविष्यातील व्यावसायिक आव्हानांसाठी स्वतःची तयारी करण्याची दिशा या संवादातून विद्यार्थ्यांना मिळाली.

कार्यक्रमास प्राचार्य डॉ. के. आय. पाटील आणि अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांचे मार्गदर्शन लाभले.  विभागप्रमुख डॉ. एस. एस. बोरचाटे यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. प्रा. एस. ए. मुजावर, प्रा. एन. पी. गायकवाड, प्रा. एस. एस. जमादार, प्रा. पी. एम. पाडोळे आणि प्रा. ए. एल. सरनोबत यांनी सहकार्य केले. टीसीएसच्या पुणे विभागातील शैक्षणिक भागीदारी गटाचे प्रादेशिक प्रमुख  आशिष शहा यांनीही कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes