प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड
schedule18 Aug 26 person by visibility 28 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर -: ‘प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. बदलत्या काळात नागरिकांनी आपल्या हक्कांसोबतच कर्तव्ये आणि कायद्याबाबत सजग राहणे गरजेचे आहे.’ असे मत गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित ‘मुक्त संवाद’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी केंद्राच्या संचालक डॉ. प्रतिभा पाटणकर यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक गायकवाड यांचा ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती गायकवाड म्हणाल्या, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी आर्थिक फसवणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे. सायबर गुन्हे तसेच आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी शासनाने केलेल्या कायद्यांची नागरिकांनी माहिती करून घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये यासाठी कायद्याचे प्राथमिक ज्ञान आणि डिजिटल साक्षरता आवश्यक आहे.’कार्यक्रमात डॉ. सचिन भोसले यांनी स्वागत केले. डॉ. नितीन रणदिवे यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, विश्वनाथ वरुटे, डॉ. संजय चोपडे, डॉ. केतकी पोवार, डॉ. नगीना माळी, नाझिया मुल्लाणी, प्रियांका सुर्वे, डॉ. प्रकाश बेळीकट्टी, नवनाथ चव्हाण, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते.