Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाडमहापालिका निवडणूक - राजकारणातून मला बदनाम करण्याचा घाट - सुशांत पोवारसचिन शिरगावकर यांना उद्योगरत्न पुरस्कार, डॉ. आनंद देशपांडेंच्या हस्ते गुरुवारी वितरण समारंभकोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडे

जाहिरात

 

ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध

schedule18 Aug 26 person by visibility 109 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावेत आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यातयासाठी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयाच्या आवारातील गोकुळ शॉपीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. प्रशासकीय मंडळाचे सदस्य सागर बलकवडेडॉ. चंद्रकांत परुळेकर आणि कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतनीकृत गोकुळ शॉपीचे उद्घाटन करण्यात आले.

          नूतनीकृत शॉपीला आकर्षक आणि सुसज्ज स्वरूप देण्यात आले आहे. येथे ग्राहकांना गोकुळचे दूध तसेच विविध दुग्धजन्य पदार्थ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तसेच लस्सीआईस्क्रीम यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेता यावायासाठी शॉपीमध्ये ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

कार्यकारी संचालक डॉ. गोडबोले म्हणाले, “गुणवत्तापूर्ण दूध व उत्पादने हीच गोकुळची ओळख आहे. गोकुळने गुणवत्तेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी ग्राहकांना दर्जेदार उत्पादने सहज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ग्राहकांना चांगल्या सुविधा देणे हे गोकुळचे प्राधान्य आहे. ग्राहकांच्या सोयीचा विचार करूनच ताराबाई पार्क येथील गोकुळ शॉपीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

 या शॉपीमध्ये गोकुळचे दूधदहीताकलस्सीबासुंदी, इलायची श्रीखंडआंबा श्रीखंडपनीरतूपटेबल बटरकुकिंग बटर, दूध पावडर, पेढाफ्लेवर्ड मिल्क, गुलाबजामून,चीज, आईस्क्रीम  यांसह विविध दुग्धजन्य पदार्थ या शॉपीमध्ये उपलब्ध आहेत. याप्रसंगी गोकुळचे मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, सिव्हील व्यवस्थापक प्रकाश आडनाईक, बाजीराव राणे, डॉ.एम.पी.पाटील, लक्ष्मण धनवडे, शॉपी चालक मंगेश गुरव उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes