कोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडे
schedule18 Aug 26 person by visibility 62 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडे तर सदस्यपदी रवींद्र मोरे यांची निवड झाली. सहकार उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी एम. ए. मुरुडकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. गटनेते रघुनाथ मांडरे यांनी प्रास्ताविक केले. संचालक दिलीप वायंदडे, आर. बी. कांबळे, प्रकाश पोवार यांची शुभेच्छापर भाषणे झाली. याप्रसंगी माजी अध्यक्ष संजय कांबळे, बी. एम. कांबळे, राहुल माणगावकर, विकास कांबळे, रघुनाथ कांबळे, योगेश वराळे, विलास दुर्गाडे, सुजाता भास्कर, सुजाता देसाई, व्यवस्थापक बाबूराव साळोखे, वसुली अधिकारी समीर कळके आदी उपस्थित होते.