कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर ! अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !
schedule19 Aug 26 person by visibility 37 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लब'च्यावतीने दरवर्षी १९ ऑगस्ट हा 'जागतिक फोटोग्राफी दिन' विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील दिवंगत ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर जॉनी ट्रेनर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जॉनी ट्रेनर जीवन गौरव पुरस्कार यंद ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांना जाहीर झाला आहे. तसेच वर्षीपासून दिवंगत प्रेस फोटोग्राफर संजय देसाई यांच्या स्मरणार्थ सुरू केलेला ,' संजय देसाई स्मृती 'विशेष दृष्टी पुरस्कार "प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात येणार आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे बुधवारी, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण समारंभ आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी पद्मश्री सुधारक ओलवे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सुधारक यांच्या आपल्या उत्कृष्ट छायाचित्रांचा 'स्लाईड शो', 'प्रेस फोटोग्राफी' व 'फोटोग्राफरने जपावयाचे सामाजिक भान' या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळचे चेअरमन ललित गांधी हे उपस्थित राहणार आहेत.