Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाडमहापालिका निवडणूक - राजकारणातून मला बदनाम करण्याचा घाट - सुशांत पोवारसचिन शिरगावकर यांना उद्योगरत्न पुरस्कार, डॉ. आनंद देशपांडेंच्या हस्ते गुरुवारी वितरण समारंभकोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडे

जाहिरात

 

डॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरण

schedule19 Aug 26 person by visibility 39 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना यंदाचा, ‘कै. डॉ. एस.एस. घाळी समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी तीन वाजता निडसोशीचे जगद्गुरु पंचम डॉ. शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली.

गडहिंग्लज येथील माजी आमदार तथा विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. एस. एस. घाळी यांच्या स्मृतिदिनी संस्थेतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा, या पुरस्कारांनी डॉ. कोरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कोरे यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कारांनी गौरविल आहे. बेळगाव जिल्ह्यात त्यांनी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले आहे. तीन वेळा राज्यसभा खासदार, एकदा कर्नाटक विधान परिषद आमदार होते. त्यांच्या आतापर्यंतच्या कामाचा गौरव म्हणून घाळी समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे डॉ. सतीश घाळी यांनी सांगितले. संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांनी, ‘कै.डॉ. घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त तीन दिवस होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. प्रा. महेश कदम यांनी वक्तृत्व स्पर्धेचा आढावा घेतला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, संचालक डॉ. विकास पाटील, महेश घाळी, किशोर हंजी, प्रा. सुभाष कोरे, प्रा. शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes