गुरुवारपासून रमजान रोजे, हिलाल कमिटीची बैठक
schedule18 Feb 26 person by visibility 31 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ पासून रमजान रोजे सुरू होत आहेत. मौलाना मन्सूर आलम कासमी यांचे अध्यक्षतेखाली मुस्लिम बोर्डिंग येथील, कार्यालयामध्ये सायंकाळी बैठक झाली. बैठकी मुंबई हिलाल कमिटी, अमारते शरीआ पटना, दारूल उलूम देवबंद, वेंगलोर, लखनौ, दिल्ली, या शहरातील हिलाल कमिटी तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने तरावीहची नमाज बुधवारी, १८ फेब्रुवारी रोजी पठण करण्यात आली. गुरुवारपासून रमजान रोजे सुरू होत आहेत असा निर्णय उलमा हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी जाहीर केले. याप्रसंगी मौलाना इरफान कासमी, मौलाना मुबीन बागवान, काजी अशरफ, मौलाना नाझिम पठाण मौलाना अब्दुल सलाम कासमी, हाफिज युनुस, ज. जाफरबाबा सय्यद, हाफीज समीर, मुफ्ती ताहिर, मौलाना रफीक सनदी, मौलाना अवुतालीव हाफिज सोहेल, मौलाना अ. वाहीद सिद्दीकी, उपस्थित होते.