Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास – कुलसचिव व्ही. एन. शिंदेकेआयटीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर स्पर्धा, सहा हजार स्पर्धकांचा सहभागगुरुवारपासून रमजान रोजे, हिलाल कमिटीची बैठकडॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव स्वीकृत नगरसेवकवरुन राजकारण गाजण्याची चिन्हे, उट्टे काढण्याच्या पावित्र्यात कदम !महापौर दररोज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत महापालिकेत ; शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीमचित्रकार बबन मानेंच्या चित्रकृतींचे मुंबईत प्रदर्शन भाजपकडून स्वीकृत नगरसेवकसाठी प्रा. जयंत पाटील, विजय जाधव, सुनील वाडकरांचे अर्जकोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पुरस्कार जाहीर, शुक्रवारी वितरण समारंभमहावीर महाविद्यालयात 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कौशल्य शिक्षण परिषद

जाहिरात

 

महावीर महाविद्यालयात 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कौशल्य शिक्षण परिषद

schedule17 Feb 26 person by visibility 90 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील महावीर महाविद्यालय (स्वायत्त) येथे शनिवार, २१ फेब्रुवारी 2026 रोजी “कौशल्याधारित शिक्षण : २१ शतकातील उच्च शिक्षणाचे परिवर्तन” या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य  अद्वैत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्राचार्य डॉ. जोशी म्हणाले, " परिषदेचे मुख्य वक्ते पद्मश्री जी. डी. यादव  असतील.  परिषदेत ते २१ व्या शतकातील बदलत्या शैक्षणिक स्थित्यंतरवार मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचे उद्घाटनपर भाषण प्रा. डॉ. अरुण पाटील  करणार आहेत. आशुतोष कापसे हे या परिषदेत   मार्गदर्शन करणार आहेत.  डॉ. गणेश चव्हाण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने उच्च शिक्षणात कौशल्याधारित, अनुभवाधारित व बहुविषयक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करणे, विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता, उद्योजकता, सर्जनशीलता, चिकित्सक विचार, संवाद व सहकार्य विकसित करणे, तसेच डिजिटल अध्यापन, कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्य या संबंधात मार्गदर्शन करणार आहेत.

परिषदेदरम्यान  अनुभवाधारित व व्यावसायिक शिक्षण, उद्योग-शैक्षणिक संस्था सहकार्य, मूल्याधारित व जीवनकौशल्य शिक्षण, तसेच कौशल्याधारित शिक्षणाचे मूल्यमापन या विषयांवर तज्ज्ञांचे चर्चासत्र व शोधनिबंध सादरीकरण होणार आहे. परिषदेचे मुख्य आश्रयदाते अध्यक्ष कल्लप्पाण्णा आवाडे व चेअरमन  ॲड. के. ए. कपसे, व्हाइस चेअरमन, ॲड. अभिजित कापसे  असून, संयोजक प्राचार्य प्रा. (डॉ.) अद्वैत जोशी आहेत.  (डॉ.) श्रद्धा पाटील (परिषद समन्वयक) डॉ. बाळगोंडा पाटील (आयोजन सचिव) व प्रा. डॉ. अंकुश बनसोडे (कोषाध्यक्ष) हे परिषद आयोजनामध्ये कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी educonf2026@mmk.ac.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes