Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास – कुलसचिव व्ही. एन. शिंदेकेआयटीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर स्पर्धा, सहा हजार स्पर्धकांचा सहभागगुरुवारपासून रमजान रोजे, हिलाल कमिटीची बैठकडॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव स्वीकृत नगरसेवकवरुन राजकारण गाजण्याची चिन्हे, उट्टे काढण्याच्या पावित्र्यात कदम !महापौर दररोज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत महापालिकेत ; शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीमचित्रकार बबन मानेंच्या चित्रकृतींचे मुंबईत प्रदर्शन भाजपकडून स्वीकृत नगरसेवकसाठी प्रा. जयंत पाटील, विजय जाधव, सुनील वाडकरांचे अर्जकोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पुरस्कार जाहीर, शुक्रवारी वितरण समारंभमहावीर महाविद्यालयात 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कौशल्य शिक्षण परिषद

जाहिरात

 

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पुरस्कार जाहीर, शुक्रवारी वितरण समारंभ

schedule17 Feb 26 person by visibility 209 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उद्योग व व्यापार क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजर्फे दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविले जाते. कोल्हापूर चेंबरतर्फे यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. शुक्रवारी, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृह येथे सायंकाळी चार वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. अशी माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे व उपाध्यक्ष राजू पाटील, भरत ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार सूरज इस्टेट डेव्हलपर्सचे सुनित चिनुभाई परीख यांना, कै. परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार मेटाफोर सिन्थेसिसचे श्रीमती नलिनी व्ही नेने यांना, कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार विवेक शिवरुद्र शेटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार-उद्योग पुरस्कार दुर्गेश बळवंत तोडकर, प्रताप भगवान पाटील यांना जाहीर झाला. मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कान्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे जनरल सेक्रेटरी खासदार प्रवीण खंडेलवाल हे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची प्रमुख उपस्थिती आहे.याप्रसंगी खंडेलवाल यांचे ‘राष्ट्रीय व्यापार उद्योग धोरण, आव्हाने व संधी’या विषयावर भाषण आहे.

  दि महाराष्ट्र कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, माजी आमदार जयश्री जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ होणार आहे. याप्रसंगी महापौर रुपाराणी निकम व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे सभासद व नूतन नगरसेवक सत्यजीत जाधव, अर्जुन माने, प्रवीण सोनवणे व शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांचा सत्कार करण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेला मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, संपत पाटील, धनंजय दुग्गे, राहुल नष्टे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes