Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास – कुलसचिव व्ही. एन. शिंदेकेआयटीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर स्पर्धा, सहा हजार स्पर्धकांचा सहभागगुरुवारपासून रमजान रोजे, हिलाल कमिटीची बैठकडॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव स्वीकृत नगरसेवकवरुन राजकारण गाजण्याची चिन्हे, उट्टे काढण्याच्या पावित्र्यात कदम !महापौर दररोज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत महापालिकेत ; शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीमचित्रकार बबन मानेंच्या चित्रकृतींचे मुंबईत प्रदर्शन भाजपकडून स्वीकृत नगरसेवकसाठी प्रा. जयंत पाटील, विजय जाधव, सुनील वाडकरांचे अर्जकोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पुरस्कार जाहीर, शुक्रवारी वितरण समारंभमहावीर महाविद्यालयात 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कौशल्य शिक्षण परिषद

जाहिरात

 

केआयटीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर स्पर्धा, सहा हजार स्पर्धकांचा सहभाग

schedule18 Feb 26 person by visibility 29 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने गेली अनेक वर्षे  पायोनियर या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई.)  चॅप्टर अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही स्पर्धा दिनांक २१ व २२ फेब्रुवारी २०२६  रोजी महाविद्यालयात  होणार आहे. गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, केरळ, राजस्थान,आंध्रप्रदेश या  राज्यातून आय.आय.टी.,एन.आय.टी.,बीटस,सी.ओ.ई.पी सह ९२ महाविद्यालयातून किमान ६००० तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी तांत्रिक महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.

मुख्यत्वे केआयटी च्या मध्यवर्ती आयोजकांकडून ‘प्रकल्प’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट प्रदर्शन, तसेच ‘अभिव्यक्ती’ राष्ट्रीय स्तरावरील पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन केले आहे. केआयटी मधील ९ विभागांच्या वतीने पुढील नऊ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. अशा प्रकारच्या ९ विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन केले आहे.सुमारे पाच लाख रुपये रोख रक्कमेची बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत.  या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २१ फेब्रुवारी २६ रोजी कमिंस इंडियाचे उपाध्यक्ष  संजय बाबर यांच्या हस्ते होणार आहे.  समारोप व  बक्षीस समारंभा्रसाठी जिओ मॅट्रिक्स ऑटोमेशन अँड रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक प्रफुल्ल कुमार कंचनी उपस्थित राहणार आहेत.  या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन स्वतःच्या क्षमतांना आव्हान देऊन या स्पर्धांच्या माध्यमातून स्वतःच्या तांत्रिक ज्ञानाची, कौशल्याचा स्तर  जाणून  घ्यावा  असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन सचिव  दीपक चौगुले यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी मिळत आहे. डॉ.संदीप देसाई हे या स्पर्धेचे निमंत्रक असून आय.एस.टी.ई. स्टुडंट चाप्टचे अध्यक्ष आदित्य पाटील आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes