चित्रकार बबन मानेंच्या चित्रकृतींचे मुंबईत प्रदर्शन
schedule17 Feb 26 person by visibility 78 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : चित्रकार बबन सावंत माने यांच्या ‘स्टेप्स ऑफ इंटरनेटी’ या एकल चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे उत्साहात पार पडले.या प्रदर्शनाचे उद्घाटन सतीश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विशेषतः वाराणसी येथील घाटांचे सौंदर्य, आध्यात्मिक वातावरण आणि सांस्कृतिक परंपरा प्रभावी रंगसंगतीतून साकारलेली पूर्ण पेंटिंग्स प्रदर्शित करण्यात आली आहेत. घाटांवरील जीवन, आरती, वास्तुशैली आणि पवित्र गंगेचे दृश्य यांचे कलात्मक दर्शन या चित्रांमधून घडते.
हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले असून वाराणसी घाटांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भावविश्वाचा अनोखा अनुभव देणारे आहे.
हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले असून वाराणसी घाटांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भावविश्वाचा अनोखा अनुभव देणारे आहे.