कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएचडी
schedule26 Nov 26 person by visibility 58 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त), वारणानगर येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. शिल्पा सर्जेराव पाटील यांना शिवाजी विद्यापीठाकडून केमिकल इंजिनिअरिंग विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी “स्टडीज ऑन रिमुव्हल ऑफ हेवी मेटल आयन्स फ्रॉम इंडस्ट्रियल वेस्टवॉटर” या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला. या संशोधनासाठी त्यांना डॉ. एस. व्ही. आणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथील केमिकल इंजिनिअरिंग विभाग हे त्यांचे संशोधन केंद्र होते. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. के. आय. पाटील अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, विभागप्रमुख, डॉ. पी. बी. डेहनकर आणि विभागातील सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.