स्वयंप्रेरिकेचा ३२ वा वर्धापनदिन उत्साहात
schedule26 Nov 26 person by visibility 46 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेचा ३२ वा वर्धापनदिन उत्साहात झाला. वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कोरगावकर ग्रुपच्या प्रमुख पाहुण्या पल्लवी कोरगावकर यांच्या हस्ते पुरस्कर्त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी • सेवाभावी कार्यकर्ती सुलभा नलवडे , ज्येष्ठ उद्योजिका - विभा देशपांडे, उत्तम हस्तकला - सुनिता नांगरे, उत्तम उद्योजिका - संगीता राणे, उत्तम फराळ ऑर्डर पुरवणाऱ्या - उज्वला पाटील, जास्तीत जास्त फराळ ऑर्डर आणणाऱ्या - हरिप्रिया दिवेकर, नवीन उत्तम पुरवठा – सुषमा चेचर, लक्ष्मी आकुरवाड, अनुराधा कातवारे, सुजाता डुणुंग, प्रणोती सुतार यांचा गौरव झाला. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमात सुवर्णा जाधव, सई काटकर, मृदुला होसूर, रोहिणी टोपराणी, गायत्री शिंगाडे, काजल पवार यांनी नृत्य सादर केले. आदित्य होसूर व विद्या काटकर यांनी एकपात्री नाटुकले सादर केले.संस्थेच्या तज्ञ संचालिका अंजली घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया भोसले यांनी सूत्रसंचालन केले.