Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएचडीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी सरदार दिंडे, व्हाईस चेअरमनपदी सोनाली गुरवसंविधान दिनानिमित्त सांगलीत ग्रंथ प्रदर्शन, दहा डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुलेओपन प्लॅटफॉर्म फॉर डायलॉग विथ व्हीसी, डॉ. व्यंकट गीते शुक्रवारी कोल्हापुरातसिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरने घेतले अंबाबाई देवीचे दर्शनशासन नियुक्त संचालक प्रकरण, पुढील सुनावणी तीन डिसेंबरडॉ. विजयकुमार माने यांचे निधनशहीद जवान सिताराम पाटील यांच्या स्मृतींना उजाळा, तिटवे येथे शहीद सन्मान दिन साजराजिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनस्वयंप्रेरिकेचा ३२ वा वर्धापनदिन उत्साहात

जाहिरात

 

संविधान दिनानिमित्त सांगलीत ग्रंथ प्रदर्शन, दहा डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुले

schedule26 Nov 26 person by visibility 59 categoryसामाजिक

महाराष्ट्र  न्यूज वन प्रतिनिधी : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंक व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल मडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, अप्पर कोषागार अधिकारी दीपाली यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, सहाय्यक शिक्षक विठ्ठल मोहिते उपस्थित होते. 

यावेळी डॉ. अनिल मडके यांनी भारतीय संविधान तसेच वाचनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. विठ्ठल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी फीत कापून प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

या ग्रंथप्रदर्शनामध्ये 70 हून अधिक दिवाळी अंक  तसेच भारतीय संविधानाच्या प्रति, महात्मा जोतीराव फुले यांची ग्रंथसंपदा मांडण्यात आली आहे. हे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, सांगली येथे 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, संशोधक, वाचक आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथसंपदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes