ओपन प्लॅटफॉर्म फॉर डायलॉग विथ व्हीसी, डॉ. व्यंकट गीते शुक्रवारी कोल्हापुरात
schedule26 Nov 26 person by visibility 52 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्यंकट गीते हे शुक्रवारी (२७ नोव्हेंबर २०२६) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते, आरोग्य विज्ञान विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘ओपन प्लॅटफॉर्म फॉर डायलॉग विथ व्हीसी’या उपक्रमातंर्गत ते विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, कोल्हापूर विभागाचे केंद्र समन्यवक डॉ. राजकुमार पाटील, उपकुलसचिव महेंद्र कोठावदे आदी उपस्थित राहणार आहेत.