सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरने घेतले अंबाबाई देवीचे दर्शन
schedule26 Nov 26 person by visibility 62 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतला. ‘ईठा’या सिनेमाच्या प्रमोशनासाठी कपूर या बुधवारी (२५ नोव्हेंबर २०२६) कोल्हापुरात आल्या होत्या. त्यांनी, दुपारी देवीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांनी स्वागत केले. दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘ईठा’हा सिनेमा चार डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे. लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा आणि लावणी प्रवासावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर या विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहे.