Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएचडीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी सरदार दिंडे, व्हाईस चेअरमनपदी सोनाली गुरवसंविधान दिनानिमित्त सांगलीत ग्रंथ प्रदर्शन, दहा डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुलेओपन प्लॅटफॉर्म फॉर डायलॉग विथ व्हीसी, डॉ. व्यंकट गीते शुक्रवारी कोल्हापुरातसिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरने घेतले अंबाबाई देवीचे दर्शनशासन नियुक्त संचालक प्रकरण, पुढील सुनावणी तीन डिसेंबरडॉ. विजयकुमार माने यांचे निधनशहीद जवान सिताराम पाटील यांच्या स्मृतींना उजाळा, तिटवे येथे शहीद सन्मान दिन साजराजिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनस्वयंप्रेरिकेचा ३२ वा वर्धापनदिन उत्साहात

जाहिरात

 

शहीद जवान सिताराम पाटील यांच्या स्मृतींना उजाळा, तिटवे येथे शहीद सन्मान दिन साजरा

schedule26 Nov 26 person by visibility 89 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘सैनिकांचे शौर्य केवळ सीमेवर लढण्यापुरते मर्यादित नसून, त्यांच्या कुटुंबीयांचाही त्याग आणि संघर्ष तितकाच मोठा असतो. सैनिकांच्या कर्तव्यामागे त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या आधाराची आणि सोसलेल्या अडचणींची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी, ’असे प्रतिपादन सेवानिवृत्त कॅप्टन तानाजी खाडे यांनी केले.
पंचवीस नोव्हेंबर १९७१ रोजी भारत -पाकिस्तान युद्धात
  जवान सीताराम पाटील यांना वीरमरण आले होते. हा दिवस शहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे 'शहीद सन्मान दिन' साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई सिताराम पाटील होत्या. 

‘ शहीद सीताराम पाटील यांच्या देशसेवेच्या प्रेरणेतून शहीद शिक्षण प्रसारक मंडळाची वाटचाल सुरू असून, संस्थेने आजवर हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. केवळ शिक्षणच नव्हे, तर विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठीही संस्था सातत्याने कार्यरत आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत पुढील पिढीसाठी हरित आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.’असे संस्थेचे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.
 महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी भाषणात, ‘भारत-पाकिस्ताच्या युद्धात शहीद सिताराम पाटील यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. समाजासाठी आणि देशासाठी त्याग करण्याची त्यांची शिकवण घेऊनच संस्था कार्यरत आहे.’असे मतव्यक्त केले. शहीद पब्लिक स्कूलचे प्राचार्य सागर भाट यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाहीर युवराज महेकर
  आणि सहकार्यांचा  देशभक्तीपर शाहिरी गीतांचा कार्यक्रम झाला.  विविध पोवाड्यांतून रणभूमीची गाथा ऐकायला मिळाली. शहीद सन्मान, देशभक्ती,आजची तरुणाई आणि सोशल मीडिया,पर्यावरण वाचवा,महिला सक्षमीकरण अशा विषयांवर  रांगोळी व चित्र रंगवणे स्पर्धा  झाल्या. प्रा. सलमा शिकलगार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दीपाली किल्लेदार यांनी आभार मानले. यावेळी विजय रानमाळे, राम माने, माजी सैनिक शंकर पाटील,शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे  सचिव दिलीप देसाई, विश्वस्त अनिल पाटील, प्राचार्य हिमांशू चव्हाण, प्राचार्या स्नेहल माळी, प्राचार्य बालिका रोडे, उपप्राचार्य सागर शेटगे उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes