महिला - बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान यांचा कार्यालयीन प्रवेश
schedule26 May 26 person by visibility 27 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :- कोल्हापूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान यांचा कार्यालयीन प्रवेश पार पडला. त्यांच्या महापालिकेतील कार्यालयाचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण उपसभापती दिपा ठाणेकर, सभागृहनेता मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, प्रभाग समिती सभापती सत्यजित जाधव, वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, नगरसेवक ऋतूराज क्षिरसागर, आश्किन आजरेकर, अभिजीत खतकर, महिला व बालकल्याण सदस्या प्राजक्ता जाधव, निलीमा पाटील, वंदना मोहिते, अरुणा गवळी, धनश्री कोरवी, अनुराधा मुळीक, जयश्री कांबळे, स्वीकृत नगरसेवक रत्नेश शिरोळकर, इस्माईल बागवान उपस्थित होते.