Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगमंत्राच्या पत्नीची निवडणुकीतून माघार ! वर्षा उसगावकरना पाठिंबा !! विद्यापीठ - उद्योगांनी एकत्रित काम करणे आवश्यक – कुलगुरू आर. के. कामतशिवाजी विद्यापीठात चार अधिष्ठातांची नियुक्ती, कुलगुरूंनी काढले आदेश शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव, सलग दुसऱ्यांदा नियुक्ती गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, कृष्णा ठाकरे प्राधिकृत अधिकारी गोकुळच्या अवसायनातील दूध संस्थांचा निकाल वेळेत न दिल्यास  आंदोलनकरवीर हायकर्सच्या सातजणांनी  फडकाविला एवरेस्ट बेस कँपवर तिरंगाकोल्हापुरात रंगतोय आयपीएल फॅन पार्क खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठकीचे आयोजन: आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुन्हा ताकतीने उभा करणार - शशिकांत शिंदे

जाहिरात

 

गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, कृष्णा ठाकरे प्राधिकृत अधिकारी

schedule25 May 26 person by visibility 115 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. सभासद संस्था प्रतिनिधींनी आपल्या प्रतिनिधींच्या नावाचे ठराव एक जुलै 2026 पर्यंत सहाय्यक निबंधक दुग्ध विभाग यांच्याकडे सादर करावयाचे आहेत.
 प्राधिकृत अधिकारी म्हणून सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. सभासद संस्थांना ठराव मागणी पत्र पाठवण्याचा कालावधी 26 मे ते एक जून आहे. तर सभासद दूध संस्थांनी आपला प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव कालावधी दोन जून ते एक जुलै 2026 असा आहे. गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. सध्या गोकुळवर पाच सदस्यीय प्रशासक आहे. गोकुळची निवडणूक लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान गोकुळशी संलग्नित 1300 प्राथमिक दूध संस्थांचे अवसायनाचे मध्यंतरी आदेश काढले होते. त्या संस्थांची सध्या सुनावणी सुरू आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes