Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगमंत्राच्या पत्नीची निवडणुकीतून माघार ! वर्षा उसगावकरना पाठिंबा !! विद्यापीठ - उद्योगांनी एकत्रित काम करणे आवश्यक – कुलगुरू आर. के. कामतशिवाजी विद्यापीठात चार अधिष्ठातांची नियुक्ती, कुलगुरूंनी काढले आदेश शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव, सलग दुसऱ्यांदा नियुक्ती गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, कृष्णा ठाकरे प्राधिकृत अधिकारी गोकुळच्या अवसायनातील दूध संस्थांचा निकाल वेळेत न दिल्यास  आंदोलनकरवीर हायकर्सच्या सातजणांनी  फडकाविला एवरेस्ट बेस कँपवर तिरंगाकोल्हापुरात रंगतोय आयपीएल फॅन पार्क खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठकीचे आयोजन: आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुन्हा ताकतीने उभा करणार - शशिकांत शिंदे

जाहिरात

 

करवीर हायकर्सच्या सातजणांनी  फडकाविला एवरेस्ट बेस कँपवर तिरंगा

schedule25 May 26 person by visibility 73 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  - कोल्हापूरच्या 'करवीर हायकर्स' च्या  सातजणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानातील आणि खडतर अशी समुद्र सपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर पोहचत 'एव्हरेस्ट बेस कँप' मोहीम शनिवारी यशस्वी केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, त्यांच्या पत्नी डाॕ सुप्रिया यांचा यात समावेश आहे.

     वयाच्या २१ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या तसेच'अन्नपूर्णा' पर्वत सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण ठरलेल्या करवीर हायकर्सच्या  कस्तुरी सावेकर यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.
     'एव्हरेस्ट बेस कँप'साठी भगवान गौतम बुध्दांच्या जन्मभूमीत नेपाळ-काठमांडूत १५ मे रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, चिपळूण येथील बी के वालावलकर रुरल मेडीकल काॕलेजच्या सहप्राध्यापक डाॕ सुप्रिया सातपुते, मुरुमचे (धाराशिव)  उद्योजक आप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता, समाज माध्यम प्रभावक पती पत्नी, नुपूर आणि अक्षय मठकर दाखल झाले.
     काठमांडू ते जगातील सर्वात धोकादायक ओळख असणाऱ्या लुकला विमानतळ येथून छोट्या विमानप्रवासानंतर प्रत्यक्षात 'इबीसी' कडे वाटचालीला सुरुवात झाली. लुकला ते फाकडींग ते नामचे बाजार ते तेंगबोचे ते दिंगबोचे ते लोबुचे ते गोरकक्षेप ते एव्हरेस्ट बेस कँप असा हा 'ट्रेक पूर्ण झाला.
      शनिवार दि २३ मे रोजी राष्ट्रीय ध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करुन या यशस्वी  मोहिमेची सांगता झाली. रात्री उणे १५ अंश सेल्सिअस तर दिवसा ४ ते ६ अंश सेल्सिअस तपमान, लोबूचे ते 'इबीसी' अतिशय जीवघेणा प्रवास ठरला. प्रतिकूल, खडतर वातावरण, दुर्गम रस्ता, हाडे गोठवणारे थंड वारे मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी जागोजागी घेत होते. वाटेत येणाऱ्या अशा आव्हानांना शरीर आणि मन सक्षमपणाने सामोरे जावू शकते, हे या  ट्रेकवरुन या पथकाने अनुभवले.नेपाळमधील 'पीक १५ अॕडव्हेंचर' चे शेखर तमांग, योगेंद्र तमांग व प्रशांत तमांग यांनी या मोहिमेत मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes