Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगमंत्राच्या पत्नीची निवडणुकीतून माघार ! वर्षा उसगावकरना पाठिंबा !! विद्यापीठ - उद्योगांनी एकत्रित काम करणे आवश्यक – कुलगुरू आर. के. कामतशिवाजी विद्यापीठात चार अधिष्ठातांची नियुक्ती, कुलगुरूंनी काढले आदेश शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव, सलग दुसऱ्यांदा नियुक्ती गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, कृष्णा ठाकरे प्राधिकृत अधिकारी गोकुळच्या अवसायनातील दूध संस्थांचा निकाल वेळेत न दिल्यास  आंदोलनकरवीर हायकर्सच्या सातजणांनी  फडकाविला एवरेस्ट बेस कँपवर तिरंगाकोल्हापुरात रंगतोय आयपीएल फॅन पार्क खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठकीचे आयोजन: आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुन्हा ताकतीने उभा करणार - शशिकांत शिंदे

जाहिरात

 

विद्यापीठ - उद्योगांनी एकत्रित काम करणे आवश्यक – कुलगुरू आर. के. कामत

schedule25 May 26 person by visibility 88 categoryउद्योग

महाराष्ट्र  न्यूज वन प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या १४ व्या कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांची कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी उद्योग व विद्यापीठ यांच्या समन्वयातून विविध विकासात्मक उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

 कुलगुरू डॉ. आर. के. कामत म्हणाले की, शेजारील बेळगाव औद्योगिकदृष्ट्या वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे कोल्हापूरातील उद्योग आणि शिवाजी विद्यापीठ यांनी एकत्रित काम करणे काळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग व विद्यापीठ यांनी हातात हात घालून काम केल्यास विद्यार्थ्यांसह उद्योग क्षेत्रालाही मोठा फायदा होईल.

सायबर सिक्युरिटी, इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप, स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांवर विशेष भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनसारख्या औद्योगिक संस्थांनी विद्यापीठाला सूचना व अभिप्राय देण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी सामंजस्य करार  करण्यासही आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी कोल्हापूरमधील फौंड्री उद्योग लक्षात घेता शिवाजी विद्यापीठात फौंड्री मटेरियल टेस्टिंग सुविधा सुरू करण्याची मागणी केली. उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांनी इंडस्ट्रियल वेस्टवर संशोधन करून हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज व्यक्त केली.

प्रा. डॉ. ज्योती जाधव यांनी उद्योग व विद्यापीठ यांच्यात नियमित संवाद होण्यासाठी संयुक्त व्हॉट्सअॅप ग्रुप स्थापन करण्याची सूचना केली. तसेच उद्योजकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्याने देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. प्रा. डॉ. एस. डी. डेळेकर यांनी शाश्वत विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून दर तीन महिन्यांनी बैठक घेण्याची सूचना केली.

सभेपूर्वी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्या हस्ते कुलगुरू कामत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. कामत यांना कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले असून त्यांनी ते स्वीकारले आहे.यावेळी कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन, प्रा. डॉ. एस. डी. डेळेकर, प्रा. सुभाष माने, हरिश्चंद्र धोत्रे, नेमिचंद संघवी,  जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, अजय देशपांडे, सीएस स्वप्नील पाटोळे, सचिन बीडकर, बडीराम वराडे, प्रदीप व्हरांबळे  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes