Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगमंत्राच्या पत्नीची निवडणुकीतून माघार ! वर्षा उसगावकरना पाठिंबा !! विद्यापीठ - उद्योगांनी एकत्रित काम करणे आवश्यक – कुलगुरू आर. के. कामतशिवाजी विद्यापीठात चार अधिष्ठातांची नियुक्ती, कुलगुरूंनी काढले आदेश शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव, सलग दुसऱ्यांदा नियुक्ती गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, कृष्णा ठाकरे प्राधिकृत अधिकारी गोकुळच्या अवसायनातील दूध संस्थांचा निकाल वेळेत न दिल्यास  आंदोलनकरवीर हायकर्सच्या सातजणांनी  फडकाविला एवरेस्ट बेस कँपवर तिरंगाकोल्हापुरात रंगतोय आयपीएल फॅन पार्क खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठकीचे आयोजन: आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुन्हा ताकतीने उभा करणार - शशिकांत शिंदे

जाहिरात

 

गोकुळच्या अवसायनातील दूध संस्थांचा निकाल वेळेत न दिल्यास  आंदोलन

schedule25 May 26 person by visibility 39 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : 
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अवसयनातून वगळण्यात आलेल्या दूध संस्थांचा निकाल तात्काळ जाहीर करावा व पात्र संस्थांना मतदानाचा अधिकार द्यावा, या मागणीसाठी गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींनी्, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली  मोर्चा काढला.  “न्याय द्या, अन्यथा संघर्ष अटळ!” असा इशारा दिला.
गडहिंग्लज तालुक्यातील अनेक दूध संस्थांची सुनावणी होऊन एक महिना उलटून गेला, मात्र सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर कार्यालयाकडून अद्याप अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी, दूध उत्पादक आणि छोट्या गावांतील दूध संस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी “सुनावणी झाली, कागदपत्रे पूर्ण झाली, तरी निकाल रखडवण्यामागे नेमके कारण काय? पात्र की अपात्र याचा निर्णय तातडीने घ्या. अन्यथा शेतकरी, दूध उत्पादक आणि संस्था प्रतिनिधींना सोबत घेऊन आणखी उग्र आंदोलन छेडण्यात येईल.”
 या मोर्चामध्ये गोड साखर चे चेअरमन प्रकाश पताडे, संचालक अरुण गवळी,  राकेश पाटील, हसन शेख, मलगोंडा  पाटील, बसगोंडा पाटील,  संग्राम पाटील,  सुनील शिंदे, अमर पाटील, क्रांती मगदूम, विनायक पाटील,   प्रकाश पाटीलसह विविध दूध संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहाय्यक निबंधक कृष्णात ठाकरे  यांनी  पात्र संस्थाना मतदानाचा अधिकार देण्यात येईल असे वचन देण्यात आले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes