Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!

जाहिरात

 

महापालिकेतील अधीक्षक विलास साळोखेना लाच घेताना अटक

schedule10 Mar 26 person by visibility 993 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधीक्षक विलास साळोखे यांना दोन हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रंगपंचमीच्या निमित्ताने उभारलेल्या रंग विक्रीच्या स्टोअरवर कारवाई न करण्यासाठी लाच मागितली होती. साळोखे यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच त्यांच्या घराची झडती घेतली जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रकाश भंडारे, हवालदार विकास माने, सुधीर पाटील, संदीप पवार, प्रशांत दावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. साळोखे यांच्या विरोधात  तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांनी  रंगपंचमीला रंग विक्रीसाठी स्टॉल आला होता. हा स्टॉल अतिक्रमणमध्ये  असल्याचे सांगत कारवाई टाळण्यासाठी साळोखेनी पंधराशे रुपयांचे लाच मागितली होती. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. या प्रक्रियेदरम्यान साळोखे यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes