Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे " संतांचे संगती " निरुपणास प्रारंभ साहित्यिक प्रा.चंद्रकुमार नलगे हे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा कणा : डॉ. शशिकांत चौधरीसाथी भरत लाटकर यांना आझादी की जंगच्या  कलाकारांनी मुंबईत श्रद्धांजलीहमारी बेटियाँ भी…बेटों से कम हैं क्या...!" मार्केट सेसविरोधात कोल्हापुरातून एल्गार, दोन ऑक्टोबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम! अन्यथा पाच लाख व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन ! !माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांचे निधनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये गुणगौरव समारंभ - गणवेश वाटपमहालक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी केदार हसबनीस, उपाध्यक्षपदी कृष्णा पाटीलकचरा वर्गीकरणासाठी पंधरा ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायतीना डेडलाइन -  सीईओ डॉ.जॅसमिन शंभर टक्के निधीसाठी जिप सदस्य भेटले मंत्र्यांना ! मंगळवारी मुंबईत आबिटकर -मुश्रीफांत चर्चा !!

जाहिरात

 

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये गुणगौरव समारंभ - गणवेश वाटप

schedule04 Aug 26 person by visibility 75 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये गुणगौरव समारंभ व गणवेश वाटपाचा कार्यक्रम झाला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव समारंभ, वाड्मय विहार मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महापौर रुपाराणी निकम  यांच्या हस्ते वाड्मय विहार मंडळाचे उद्घाटन तसेच शाळेतील १०० विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या वेबसाईट्सचे अनोखे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी महापौर निकम यांनी, विद्यार्थिनींना आत्मनिर्भर, आत्मविश्वासू आणि ध्येयवेडे बनण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात  लोहिया यांनी, संस्थेचा गौरवशाली इतिहास सांगत सकारात्मक विचार, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. याप्रसंगी  संस्थेचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर,  स्कूल कमिटी सदस्या उत्कर्षा पाटील, मनिषा वाडीकर,नगरसेविका दीपा काटकर, नगरसेविका माधुरी व्हटकर, सुजाता निर्मल लोहिया, श्रीमती अनेरी दिपक लोहिया, डॉ.शीतल धर्माधिकारी, सचिव प्रभाकर हेरवाडे, सहसचिव  एस. एस.चव्हाण , ओंकार व कल्याणी राशीनकर  उपस्थित होते. मुख्याध्यापिका सविता पाटील यांनी प्रास्ताविकांत शाळेचा सातत्याने उंचावत असलेला शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची निष्ठा व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पालकांचा वाढता विश्वास यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अस्मिता पाटील आणि मृणाल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. होत्या. उपमुख्याध्यापक  रत्नाकर घाटगे यांनी आभार मानले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes