कचरा वर्गीकरणासाठी पंधरा ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायतीना डेडलाइन - सीईओ डॉ.जॅसमिन
schedule04 Aug 26 person by visibility 164 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ग्रामपंचायतीमार्फत गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण झाले पाहिजे. ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण करुनच संकलन करा. पंधरा ऑगस्टपर्यत या पद्धतीने कचरा संकलन करावा. कचरा वर्गीकरण कशा प्रकारे होते हे तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांकडून तपासले जाईल.’अशा स्पष्ट सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी दिल्या. तसेच औद्योगिक वसाहतीमधील कचऱ्याचे संकलन व निर्गत संबंधित ग्रामपचायंतीनी करायच्या आहेत असेही बैठकीत स्पष्ट केले. जिल्हा परिषदेत आयेजित बैठकीत त्या बोलत होत्या. करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील मोठया गावातून कचरा संकलन होते, मात्र वर्गीकरण होत नाही.यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. जमा करणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण पंधरा ऑगस्टपर्यंत करावे.’अशा सूचना त्यांनी केल्या. याप्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन प्रकल्प् संचालक माधुरी परीट आदी उपस्थित होते.
………………