महालक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी केदार हसबनीस, उपाध्यक्षपदी कृष्णा पाटील
schedule04 Aug 26 person by visibility 45 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील महालक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सीए केदार हसबनीस तर उपाध्यक्षपदी कृष्णा काशीद यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी हसबनीस यांचे नाव संचालक डॉ. राजेंद्र किंकर यांनी सुचविले. त्यास संचालिका पद्मजा आपटे यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपदासाठी काशीद यांचे नाव संचालक रवी शिराळकर यांनी सुचविले. संचालक रघुनाथ लाटकर यांनी अनुमोदन दिले. ज्येष्ठ संचालक अॅड. रघुनाथ लाटकर, विनोद डिग्रजकर, प्रशांत कासार, श्रीधर कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, डॉ. रुपा नागांवकर, उदय महेकर, श्रीकांत हेर्लेकर, अशोक मुंडरगी, नितीन डोईफोडे, मेघा जोशी, राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते. सी. एम. इंगवले यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.