Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूककोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधवस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !णणजझ त

जाहिरात

 

कोल्हापूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक, रेल्वे प्रकल्पासह सर्किट बेंचसंबंधी चर्चा!

schedule30 May 25 person by visibility 184 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : "कोल्हापूर फर्स्ट" च्या शिष्टमंडळाने  गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कोल्हापूर–वैभववाडी कोकण रेल्वे मार्ग प्रकल्प व कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीस माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे विशेष उपस्थित होते.

"कोल्हापूर फर्स्ट" चे समन्वयक सुरेन्द्र जैन यांनी कोल्हापूर–वैभववाडी कोकण रेल्वे मार्ग प्रकल्पाची सविस्तर मांडणी केली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा या तीनही भौगोलिक पट्ट्यांना पर्यटन, उद्योग, व्यापार व बंदर विकासाच्या दृष्टीने अभूतपूर्व चालना मिळेल असे नमूद केले. कोल्हापूर फर्स्टचे सहसमन्वयक ॲड. सर्जेराव खोत यांनी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भातील सद्यस्थितीची माहिती दिली. कोल्हापूरसारख्या महत्वाच्या विभागाला न्यायप्रवेश सुलभ होण्यासाठी सर्किट बेंच आवश्यक आहे. आपण मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अलोक आराध्य आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करावा. कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच स्थापना व्हावे याकरिता शिफारस करावी.

माजी रेल्वेमंत्री  सुरेश प्रभू यांनी, कोल्हापूर–वैभववाडी प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने यापूर्वीच सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आहे,. २०१६ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्यात आली होती. सध्या हा प्रकल्प 'पंतप्रधान गतिशक्ती योजने'च्या अंतर्गत आहे. या प्रकल्पपूर्ती साठी सर्वोतपारी मदत करू अशी त्यांनी ग्वाही दिली.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन्ही राज्यांना लाभ होणाऱ्या या विकासात्मक प्रकल्पांसाठी गोवा सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, माजी अध्यक्ष बाबासो कोंडेकर, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, कंपनी सेक्रेटरी असोसिएशनचे चेअरमन जयदीप पाटील, माजी चेअरमन पदमसिंह पाटील, सचिन बीडकर, कोल्हापूर फर्स्टचे पीआरओ विकास जगताप  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes