Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात, पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनची समस्याकिसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सागर कोंडेकरनेर्लीत सतेज - ऋतु बैलगाडी शर्यतीचा थरार, सरपंच राजा-आरएक्स बैज्या बैलजोडीने जिंकले मैदान वीरशैव लिंगायत दीपस्तंभ पुरस्कारांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा मरणोत्तर सन्मानराजारामपुरीतून रॅली, कार्यकर्त्यांच्या घोषणा अन् जल्लोषी स्वागत ! विजय जाधव यांचा कार्यालय प्रवेश !!चंदेरी आठवणींना उजाळा देत प्रभात फिल्म कंपनीचा वर्धापनदिन साजराबाजार समितीच्या ५५ माजी संचालकांना नोटीस, जिल्हा सहकार उपनिबंधकांची कार्यवाहीगोकुळच्या ठेवीत १९० कोटींची वाढ, दूध संकलनातही वाढ-योगेश गोडबोलेवीज कंत्राटी कामगार संघाची पुण्यात बैठक ! तर ३० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन !! लिंगायत माळी समाज कोल्हापूरतर्फे नऊ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जाहिरात

 

ऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षाव

schedule31 May 25 person by visibility 136 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव झाला. कसबा बावडा येथील यशवंत निवास आणि  डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ  इंजीनिअरिंग, साळोखेनगर येथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आजी- माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, हितचिंतक व  विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी गर्दी होती.

  ऋतुराज पाटील यांनी सकाळी डी वाय पाटील ग्रुपचे संस्थापक, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादासाहेब यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.  यावेळी शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, वैजयंती संजय पाटील, आमदार सतेज डी. पाटील, पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज संजय पाटील,  वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील,  देवश्री सतेज पाटील, अर्जुन व आर्यमन पाटील आदी  उपस्थित होते.  
   
सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी तर सायंकाळी  सहा ते दहा या कलावधीत साळोखेनगर येथील डी. वाय पाटील कॉलेज येथे पाटील यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. माजी आमदार राजीव  किसनराव आवळे, के. पी. पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, गोशिमा चेअरमन दीपक चोरगे, मौनी विद्यापीठ चेअरमन मधुकर देसाई, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण,  विजय देवणे, आर. के. पोवार, सुनील मोदी,  गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील आबाजी, अरुण डोंगळे, करणसिंह गायकवाड, अजित नरके,बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगुले, एस आर पाटील, राजेंद्र मोरे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके,  प्रा. सुनील शिंत्रे, राहुल खंजिरे,  शशिकांत खवरे, सत्यजित दि. जाधव,  दौलत देसाई,  स्थायी समिती माजी सभापती राजू लाटकर, भूपाल शेटे, संजय मोहिते,  अर्जुन माने, इंद्रजीत बोंद्रे, राहुल माने, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, संदीप नेजदार,  प्रताप जाधव, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, आर. एस. कांबळे, मानसिंग बोंद्रे,  मंजित माने, विराज पाटील, राजवीर नरके, भारत पाटील भूयेकर, सुयोग मगदूम, आदींनी यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. खासदार शाहू छत्रपती यांच्यासह विविध पक्षातील नेत्यांनी, आमदार-खासदारांनी  फोनवरून शुभेच्छा दिल्या.
    

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes