Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या ठेवीत १९० कोटींची वाढ, दूध संकलनातही वाढ-योगेश गोडबोलेवीज कंत्राटी कामगार संघाची पुण्यात बैठक ! तर ३० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन !! लिंगायत माळी समाज कोल्हापूरतर्फे नऊ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारकोल्हापुरात दोन दिवसीय समर यूथ समिटस्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूक

जाहिरात

 

वडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूक

schedule31 May 25 person by visibility 153 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वार शनिवार (३१ मे २०२५)सकाळी नऊची वेळ. स्थळ- वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे  कागलमधील निवासस्थान.  घरासमोरील मंडपातील गोकुळच्या अध्यक्ष निवडीबद्दल नवीद मुश्रीफ यांचे अभिनंदन करण्यासाठी जिल्ह्यातील संस्थाप्रमुख आणि कार्यकर्त्यांची लागलेली रीघमंत्री मुश्रीफ
कार्यकर्त्यांच्या गराड्यातच घरातून बाहेर आले आणि त्यांचे सुपुत्र व गोकुळचे नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी त्यांना मिठी मारली. वडिलांना
  मिठी मारताच भावुक झालेल्या नवीद यांना त्यांच्या तोंडून शब्दही फुटेनात. परंतु; डोळ्यातील अश्रू मात्र वाहत होते. मंत्री  मुश्रीफ यांनी  नवीद यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि आशीर्वाद दिले. अभिनंदन करून आशीर्वाद देतानाच त्यांनी नवीद यांना गोकुळच्या कारभाराविषयी सूचनाही दिल्या.  पहाटे पाच वाजल्यापासून जनावरांच्या शेणा- मुतात हात घालून काबाडकष्ट करणाऱ्या माता-भगिनींच्या आणि शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून हा संघ फुलला आहे.

गोकुळ दूध संघ म्हणजे शेतकऱ्यांच्या अविरत काबाडकष्टाचे श्रम मंदिर आहे. त्यांना सदैव न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहा. सहकारात काम करीत असताना सभासद संस्था म्हणजेच शेतकरीच या गोकुळ दूध संघाचे मालक आहेत आणि आपण विश्वस्त आहोत, या भावनेनेच काटकसरीने आणि पारदर्शी काम करा. गोकुळ दूध संघाचा लौकिक उंचावण्यासाठी अहोरात्र कठोर परिश्रम घ्या, असेही ते म्हणाले.

……………..

मुश्रीफ म्हणतात ही माझी हतबलता
पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ अध्यक्ष पदाच्या निवडीकामी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. दरम्यान;  गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी नवीद मुश्रीफ यांचे नाव निश्चित होणे, ही माझी हातबलता होती. तसेच; प्रत्येक माणसाबद्दल विशेषत: गोरगरिबांबद्दल आणि अगदी शत्रूबद्दलसुद्धा साफ नियत आणि दानत,गेली  ३५-४० वर्षे सामाजिक आणि राजकीय जीवनात कठोर परिश्रम ही पुण्याई माझ्या पाठीशी आहे.
        

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes