Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या ठेवीत १९० कोटींची वाढ, दूध संकलनातही वाढ-योगेश गोडबोलेवीज कंत्राटी कामगार संघाची पुण्यात बैठक ! तर ३० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन !! लिंगायत माळी समाज कोल्हापूरतर्फे नऊ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारकोल्हापुरात दोन दिवसीय समर यूथ समिटस्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूक

जाहिरात

 

जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !

schedule31 May 25 person by visibility 238 categoryआरोग्य

कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा अमेरिेकेतील कॅन्सर सेंटरशी करार

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या जीवनात प्रकाशाचा किरण आणणाऱ्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे नाव आता जागतिक स्तरावर पोहोचले आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकेशी सामज्यंस करार केला आहे. यामुळे रुग्णांना जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचारांचा लाभ मिळणार आहे. तसेच कॅन्सर क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनचा लाभ रुग्णसेवेकरिता होणार आहे.

या सामज्यंस करारावर कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन डॉ. सूरज पवार व कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर राजेश मंथेना यांनी स्वाक्षरी केल्या. कराराचे आदान-प्रदान केले. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा येथील पन्नास हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथ झाले आहेत. नव्या सामज्यंस करारामुळे देशभरातील रुग्णांबरोबर परदेशातील रुग्णांना सेवा मिळणार आहे.

या करारादरम्यान अमेरिकेतून कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेचे चेअरमन ऑफ बोर्ड डॉ. शालीन शहा यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रमात सहभाग नोंदविला. शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. रेश्मा पवार, स्मिता राजू, डॉ. योगेश अनाप, डॉ. पराग वाटवे, दयाकर पी, साई संदीप कटेपल्ली आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes