Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या ठेवीत १९० कोटींची वाढ, दूध संकलनातही वाढ-योगेश गोडबोलेवीज कंत्राटी कामगार संघाची पुण्यात बैठक ! तर ३० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन !! लिंगायत माळी समाज कोल्हापूरतर्फे नऊ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारकोल्हापुरात दोन दिवसीय समर यूथ समिटस्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूक

जाहिरात

 

कोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधव

schedule31 May 25 person by visibility 100 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी विजय जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. भाजपचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत. राज्यातील एकूण २२ पदाधिकाऱ्यांच्या निवडी  शनिवारी (३१ मे २०२५) रोजी जाहीर झाल्या. यापूर्वी कोल्हापूर ग्रामीण पश्चिम अध्यक्षपदी नाथाजी पाटील, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर यांच्या निवडी झाल्या आहेत. कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ? याकडे लक्ष होते.

कोल्हापूर महानगर अध्यक्षपदासाठी विजय जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर व महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाराणी निकम यांची नावे चर्चेत होती. मंडल अध्यक्षांच्या निवडीही पार पडल्या आहेत. यामुळे महानगर जिल्हाध्यक्षपदाबाबत उत्सुकता होती. महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून विजय जाधव यांनी सगळयांना सोबत घेऊन काम करणाऱ्यावर भर दिला आहे. उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांनी पक्षातील प्रत्येक घटकाशी उत्तम समन्वय ठेवला आहे.  खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासोबत समन्वय आहे.  प्रदेश चिटणीस महेश जाधव  व अन्य सहकाऱ्यांच्या सोबत काम करत पक्ष संघटनकडेही लक्ष दिले. यापूर्वी त्यांना महानगर अध्यक्ष म्हणून कालावधी कमी मिळाला होता. त्यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील,  प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून संघटनात्मक पातळीवर ज्या जबाबदारी सोपविल्या त्या जबाबदारीने पार पाडत त्यांनी विश्वास संपादन केला होता. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes