Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भटके‑विमुक्तांचा इतिहास हा जिद्दीचा...संघर्षाचा अन् स्वाभिमानाचा !ऑलम्पिंकवीर खाशाबांचे चरित्र सर्वांना नेहमीच प्रेरणादायी - पै . विष्णू जोशीलकरसुटा अंतर्गत धुसफूस, संघर्ष समितीचे कार्यालयासमोर  धरणे आंदोलनडी वाय पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सवाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रोबोटिक्स प्रशिक्षणकलनाकवाडीत शेतकऱ्यांना सीएसआर फंडातून फवारणी पंपांचे वाटपशिवाजी विद्यापीठात बुधवारी वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभजुनी पेन्शनसाठीच्या मूक मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठ, मुध्याध्यापक संघाचा पाठिंबादप्तर झाले हलके... आनंदित झाली बालके !होस्टेलमध्ये रक्षाबंधन, विद्यार्थिनींनी बांधली कृष्णराज महाडिकांना राखी

जाहिरात

 

गोळीबारच्या घटनेने कोल्हापूर हादरले, खाजगी सावकारीतून गोळीबाराची चर्चा

schedule16 Jul 26 person by visibility 854 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात गुरुवारी दुपारी गोळीबाराचा प्रकार घडला. रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेला संशयित सूरज साखरेवर  तीन गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे यामध्ये सूरज साखरे जखमी झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोचले आहेत त्यांच्याकडून तपास सुरू आहे. खाजगी सावकारीतून हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे

 फुलेवाडी रिंगरोड परिसरातील  क्रांतिसिंह नाना पाटील चौकाजवळ गोळीबाराची घटना घडली. हल्लेखोरांनी  साखरेवर तीन राऊंड फायर केल्याचे समजते.  गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले तर साखरेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साखरेवर यापूर्वीही  गंभीर गुन्हे दाखल  आहेत.  महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतही कारवाई झालेली आहे. साखरे हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes