Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रकाराची शिवभक्ती, चित्रातून उलगडला शिवछत्रपतींचा इतिहास !जोतिबा मंदिर विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पाठीशी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रंथपाल - शारीरिक शिक्षण संचालकपदाच्या भरतीसाठी प्राचार्य असोसिशनने घेतली मंत्र्यांची भेटबीबीए, बीसीएसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा होणार- मंत्री चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचनाशिक्षकांचा प्रशिक्षणामधील अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करावा : भरत रसाळेगोकुळच्या राजकारणात महादेवराव महाडिकांची एंन्ट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू ! सत्ताधारी नेतृत्वावर डागली तोफ !गोकुळचे  चेअरमन-संचालकांनी घेतली अजित पवारांची भेट, दुग्ध व्यवसायसंबंधी चर्चा !!जेईई अॅडव्हान्स परीक्षेत विवेकानंद  कॉलेजचे यश महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात, ८१ प्रभागात नागरिकांसाटी शिबिरेभालकर्स कला अकादमीचे पुरस्कार जाहीर ! अनिल वेल्हाळ, सतीश रणदिवे, दिलीप बापट, प्रवीण कोडोलीकरांचा समावेश !!

जाहिरात

 

केआयटीतर्फे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंबंधी रविवारी मार्गदर्शन कार्यक्रम

schedule04 Jun 25 person by visibility 154 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्यावतीने रविवार ( ८ जून २०२५)  प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया संदर्भात मोफत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सायबर कॉलेज कॅम्पसमधील आनंद भवन सभागृहात दुपारी चार वाजता होणार आहे अशी माहिती संस्थेचे सचिव दीपक चौगुले व संचालक मोहन वनरोट्टी यांनी दिली.  

  ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२५’ या विषयावरती मार्गदर्शनपर केले जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी केआयटीचे बदलते स्वरूप, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले विविध प्रयत्न, नवीन शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अभ्यासक्रमांमध्ये सुरू असलेले अमुलाग्र बदल याबाबतीत संस्थेचे संचालक मोहन वनरोट्टी यांनी दिली. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया ही थोडी गुंतागुंतीची आहे. प्रवेश प्रक्रियेत असणाऱ्या एकूण टप्प्यांवरती एखादी झालेली छोटी चूक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान ठरू शकते. याचे गांभीर्य ओळखूनच केआयटी विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे असे सांगितले.

 कार्यक्रमात अभियांत्रिकीच्या विविध विभागातील करिअरच्या संधी, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील टप्पे, महत्त्वाची कागदपत्रे, शिष्यवृत्ती, आरक्षण, सरकारी नियम, विद्यार्थिनीसाठीच्या सरकारी सवलती याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे अधिष्ठाता, अॅडमिशन डॉ.महेश शिंदे यांनी सांगितले. रविवारी होणारा प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनाचा कार्यक्रम  पालक, विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः विनामूल्य आहे. हा कार्यक्रम आपल्या सर्व संबंधित शंकांचे निरसन करेल असा विश्वास यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes