महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात, ८१ प्रभागात नागरिकांसाटी शिबिरे
schedule04 Jun 25 person by visibility 381 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून त्यांना आवश्यक सामाजिक, आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे तसेच आपापल्या परिसरात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील राहावे अशा सामाजिक आणि लोकोपयोगी विविध उपक्रमांसाठी भाजपा सदैव आपल्या पाठीशी असल्याचे नमूद केले. आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही संधी जनसेवा म्हणून उपयोगात आणावी.’असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मंत्री पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता पक्षातर्फे येत्या महिनाभरात सरकारी दाखले सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी शिबिर आयोजित केले आहे. कोल्हापूर शहरातील ८१ प्रभागात शिबीर होणार आहेत. लक्ष्मीपुरी मंडलात मंत्री पाटील यांनी आयोजित शिबिराच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच लक्ष्मीपुरी मंडलातील कार्यकर्त्यांना अक्कमहादेवी मंटप येथे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहूल चिकोडे, विशाल शिराळकर, धनश्री तोडकर, आप्पा लाड, अतुल चव्हाण, संतोष माळी, विजय दरवान, अवधूत भाट्ये, रश्मी साळोखे, विजयमाला जाधव, आसावरी जुगदार, महेश यादव, मंगला निपाणीकर उपस्थित होते. शिबिरामध्ये आधार कार्ड दुरुस्ती, मोफत उत्पन्न दाखला, मोफत रहिवासी दाखला, मोफत डिजिटल रेशनकार्ड व आधारकार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिराच्या पहिल्या टप्प्यात दिनांक ३ ते १४ जून या कालावधीत २५ ठिकाणी शिबीर होणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.