Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रकाराची शिवभक्ती, चित्रातून उलगडला शिवछत्रपतींचा इतिहास !जोतिबा मंदिर विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पाठीशी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रंथपाल - शारीरिक शिक्षण संचालकपदाच्या भरतीसाठी प्राचार्य असोसिशनने घेतली मंत्र्यांची भेटबीबीए, बीसीएसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा होणार- मंत्री चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचनाशिक्षकांचा प्रशिक्षणामधील अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करावा : भरत रसाळेगोकुळच्या राजकारणात महादेवराव महाडिकांची एंन्ट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू ! सत्ताधारी नेतृत्वावर डागली तोफ !गोकुळचे  चेअरमन-संचालकांनी घेतली अजित पवारांची भेट, दुग्ध व्यवसायसंबंधी चर्चा !!जेईई अॅडव्हान्स परीक्षेत विवेकानंद  कॉलेजचे यश महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात, ८१ प्रभागात नागरिकांसाटी शिबिरेभालकर्स कला अकादमीचे पुरस्कार जाहीर ! अनिल वेल्हाळ, सतीश रणदिवे, दिलीप बापट, प्रवीण कोडोलीकरांचा समावेश !!

जाहिरात

 

भालकर्स कला अकादमीचे पुरस्कार जाहीर ! अनिल वेल्हाळ, सतीश रणदिवे, दिलीप बापट, प्रवीण कोडोलीकरांचा समावेश !!

schedule04 Jun 25 person by visibility 271 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गेली ११ वर्ष चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशन, कोल्हापूर संचलित भालकर्स कला अकादमीमार्फत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. भालकर्स कला अकादमीने यंदाचे (२०२५), पुरस्कार जाहीर केले आहेत. गुरुवारी, १२ जून रोजी गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा आहे. सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम आहे. यंदा, पुरस्कार वितरणाचे १२ वे वर्ष आहे.
   यावर्षी कलामहर्षीबाबुराव पेंटर स्मृती कलासेवा पुरस्कार  हा जेष्ठ छायाचित्रकार अनिल वेल्हाळ
 यांना तर चित्रतपस्वी भालजी पेंढारकर स्मृती चित्रसेवा पुरस्कार - ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश रणदिवे यांना जाहीर केला आहे. कै.मदन मोहन लोहिया स्मृती नाट्यसेवा पुरस्कार  हा नाटयकर्मी दिलीप बापट यांना, संगीतकार यशवंत देव स्मृती संगीतसेवा पुरस्कार हा जेष्ठ संगीतकार उमेश नेरकर यांना मिळाला आहे.

कै. लक्ष्मण महालिंगा भालकर स्मृती सामाजिक लक्ष्यरत्न प्रेरणा पुरस्कार हा डॉ.प्रविण कोडोलीकर यांना तर, मास्टरजी सुबलदा सरकार स्मृती नृत्यसेवा पुरस्कार हा जेष्ठ अभिनेत्री शोभा शिराळकर यांना जाहीर झाले आहेत. यासोबत  विशेष सन्मान आणि भालकर्स अभिमान पुरस्कार ही दिले जाणार आहेत. पुरस्कार वितरणसोबत कला वैभव जपूया  नृत्यनाटिका सादरीकरण आहे.  स्व.मनोजकुमार यांना नृत्य अभिवादन अशा  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

याप्रसंगी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य अमरसिंह रजपूत,  विद्यार्थी विकास मंडळाचे माजी संचालक पी.टी.गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती आहे.  अशी माहिती संकल्पक,  दिग्दर्शक संग्राम यशवंत भालकर यांनी सांगितले याप्रसंगी फौंडेशनचे अध्यक्ष संदिप भालकर,उपाध्यक्ष सपना जाधव भालकर , अकादमीचे  आजी माजी विद्यार्थी कलाकार हे उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes