Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदलीचा कार्यक्रम जाहीरगोकुळमध्ये शिवराज्याभिषेकदिन साजराकोल्हापुरात सोमवारी -मंगळवारी पाणी पुरवठा बंदमहावितरणच्या वीज प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा सोमवारी ऊर्जा दरबारशारंगधर देशमुखांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! मेळावा घेऊन कोल्हापुरात होणार पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या पुण्यातील कार्यक्रमाला कोल्हापुरातून 5000 कार्यकर्ते जाणारचित्रकाराची शिवभक्ती, चित्रातून उलगडला शिवछत्रपतींचा इतिहास !जोतिबा मंदिर विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पाठीशी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रंथपाल - शारीरिक शिक्षण संचालकपदाच्या भरतीसाठी प्राचार्य असोसिशनने घेतली मंत्र्यांची भेटबीबीए, बीसीएसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा होणार- मंत्री चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात

 

शिक्षकांचा प्रशिक्षणामधील अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करावा : भरत रसाळे

schedule05 Jun 25 person by visibility 186 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : राज्य सरकारमार्फत  सुरू असलेल्या वरिष्ठ-निवड श्रेणी प्रशिक्षणा दरम्यान  पहिल्या दिवशी पाऊस व अन्य कारणांमुळे कांही शिक्षक प्रशिक्षणाला वेळेत उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचा हा कालावधीत क्षमापित करून त्यांना प्रशिक्षण पूर्ण करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केली.

 समितीच्यावतीनेजिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ .महादेव वांडरे यांना निवेदन दिले. दोन जूनपासून राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण चालू आहे. यामध्ये प्रत्येक तासाची उपस्थिती व मूल्यमापन सक्तीचे आहे. पहिल्या दिवशी पाऊस व अन्य कारणास्तव काही शिक्षक पहिल्या तासिकेला उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणून त्यांना या प्रशिक्षणातून बाजूला करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश मागे घेऊन त्यांचे शैक्षाणिक नुकसान टाळावे अशी मागणी केली. हे निवेदन मेलद्वारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे पाठविले. समितीच्या या शिष्टमंडळामध्ये राज्याध्यक्ष भरत रसाळे, राज्यसचिव शिवाजी भोसले, विभागीय अध्यक्ष महादेव डावरे, कार्याध्यक्ष शिवाजी सोनाळकर, परवेज कलाल, माधवी मोरे, डॉ. दमयंती जत्राटे, रेखा नाईक, अर्चना कुंडले, सई कांबळे, राजेंद्र अपुगडे, शरद गावडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes