Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकरसंच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा कोल्हापूर फर्स्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार ! कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद भरविणार !!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सतंत्रज्ञान युगात जीआयएसचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू  डी. टी. शिर्केमार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ सार्वजनिक कार्यक्रमात अश्लिल - आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास प्रतिबंध करा - कलापथक निर्माता असोसिएशनराज्यस्तरीय तेली समाजाच्या व्यासपीठावर मंत्री बावनकुळे - विजय वडेट्टीवारांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी ! पक्ष प्रवेशाची ऑफर, एक नंबर मंत्रीपदासाठी शुभेच्छा!!

जाहिरात

 

तंत्रज्ञान युगात जीआयएसचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू  डी. टी. शिर्के

schedule24 Aug 26 person by visibility 43 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : वारणा विद्यापीठ, वारणानगर येथे यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय आणि तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भौगोलिक माहिती प्रणाली’ या विषयावरील एक आठवड्याच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

आजच्या बदलत्या तंत्रज्ञान युगात विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक यांनी भौगोलिक माहिती प्रणाली या तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन वारणा विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी उद्घाटनप्रसंगी केले. या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून भविष्यात अनेक उपयोजित माहितीचे विश्लेषण करणारे नकाशे तयार होतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागाचे डॉ. अभिजीत पाटील उपस्थित होते. त्यांनी पहिल्या सत्रात जीआयएस  ची संकल्पना व संशोधनातील महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केले. आधुनिक काळात या तंत्रज्ञानाचा वापर कसा प्रभावीपणे करता येऊ शकतो, यावर त्यांनी प्रकाश टाकला.

यासाठी श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिनी यांचे मार्गदर्शन लाभले.भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी. एस. राऊत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. जी. जांभळे यांनी सूत्रसंचालन केले. वारणा विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. आर. बी. पाटील यांनी आभार व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes