Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ सार्वजनिक कार्यक्रमात अश्लिल - आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास प्रतिबंध करा - कलापथक निर्माता असोसिएशनराज्यस्तरीय तेली समाजाच्या व्यासपीठावर मंत्री बावनकुळे - विजय वडेट्टीवारांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी ! पक्ष प्रवेशाची ऑफर, एक नंबर मंत्रीपदासाठी शुभेच्छा!!विद्यार्थी - पालकांनी जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे :  आमदार सतेज पाटील आधी नोंदणी - मग स्थापना, तरीही संरक्षण ? गोकुळमधील अवसायन संस्थेसंबंधी उलटसुलट चर्चामंगेश चिवटेंना शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत पाठवा : आमदार राजेश क्षीरसागर,  आमदार सुहास बाबर यांची  मागणीगोकुळच्या राजकारणात आमनेसामने उभे ठाकलेले एसटी बसेसच्या उद्घाटनला एकत्रविद्यार्थी चमकले शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत, शाळेने काढली मिरवणूक झोकात!व्यापारी किशोरकुमार नष्टे यांचे निधनजुनी पेन्शनसाठी शिक्षकदिनी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

जाहिरात

 

सार्वजनिक कार्यक्रमात अश्लिल - आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास प्रतिबंध करा - कलापथक निर्माता असोसिएशन

schedule23 Aug 26 person by visibility 105 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :‘सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अश्लिल किंवा आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास प्रतिबंध करावा. डीजे शो, ट्रॉली शोवर बंदी घालावी. यात्रा, जत्रा, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमामध्ये नृत्य कार्यक्रमांना परवानगी देताना प्रशासनाने स्पष्ट नियम व आचारसंहिता लागू करावी.’ अशी मागणी कलापथक निर्माता असोसिएशनने केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद सुतार, उपाध्यक्ष शारदा हिलगे  व अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध अशा लोककला, लावणी, कलापथक आणि पारंपरिक नृत्यांचा मोठा वारसा लाभला आहे. मात्र अलीकडच्या काळात काही सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव व मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये अश्लिल हावभाव, अंगविक्षेप व आक्षेपार्ह नृत्याचे प्रकार वाढत आहेत. अशा प्रकारांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची प्रतिमा मलीन होत आहे. यामुळे अश्लिल नृत्यप्रकार, आक्षेपार्ह डान्स शो, डीजे लावणी शो व ट्रॉली शोवर बंदी घालावी. अश्लिल नृत्य करणाऱ्या बाहेरच्या नृत्यांगणा आपल्या नावांपुढे कोल्हापूरचे नाव लावून कलानगरीच्या सांस्कृतिक परंपरेला बदनाम करत आहेत. तेव्हा कलेच्या नावाखाली अश्लिलतेचा बाजार आम्ही सहन करणार नाही.’असा इशारा कलापथक निर्माता असोसिएशने दिला आहे. यासंबंधी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाला निवेदन देऊ असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes