कोल्हापुरात साहित्यिक, प्राध्यापक- शिक्षकांनी उगारली सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाची मूठ
schedule25 Jul 26 person by visibility 188 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्य लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात शनिवारी २५ जुलै २०२६ साहित्यिक, कवी, प्राध्यापक-शिक्षक, कलावंत व सामाजिक कार्यकर्ते एकवटले. राजर्षी शाहू समाधी स्थळ येथे धरणे आंदोलन करत केंद्र सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध केला. यावेळी मान्यवरांच्या भाषणाद्वारे ‘झेन जीने नवं आंदोलनाची दिशा दाखविली. सरकारलाही नमवू शकतो’हा आत्मविश्वास देशवासियांत जागविला. ही नव्या बदलाची, नव्या वाटचालीची सुरुवात आहे. त्याला एक चळवळीचे स्वरुप देऊ या.’असा निर्धार करण्यात आला.
नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला. विद्यार्थ्यांची अडवणूक केली. सरकार पातळीवरुन जवळपास तीन आठवडे कोणताही संवाद नव्हता. असा आक्षेप ठेवत कोल्हापुरातील साहित्यिक, कवी, प्राध्यापक, शिक्षक, कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणी सरकारचा धिक्कार केला. नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आता टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
‘देशातील तरुण पिढीने हे नवं आंदोलन पुकारत सत्ताधीशांना नमविले. झेन जीची आंदोलनाची भाषा नवी ऊर्जा जागविणारी आहे. या तरुण पिढीने सिनीअर मंडळींना जे जमले नाही ते करुन दाखविले. ’अशी मनोगत झाली. झेन जीचे आंदोलन म्हणजे नव्या बदलाची सुरुवात आहे असे अनेकांनी नमूद केले. जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरात उत्स्फूर्त आंदोलने झाली. मोर्चे झाले. सभा झाल्या. आता या साऱ्या प्रक्रियेला चळवळीचे स्वरुप देण्यासाठी पुन्हा पुन्हा सारे जण एकत्र येऊ या. अशी साद मान्यवरांनी घातली. साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. राजन गवस, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. माया पंडित, डॉ. राजेंद्र कुंभार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. भारत पाटणकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. आमदार जयंत आसगावकर यांनी सरकारी धोरणावर टीका केली.
कॉम्रेड संपत देसाई यांनी साहित्यिक, कवी, प्राध्यापक, शिक्षक, कलावंत या साऱ्यांना एकत्र आणण्यामागील उद्देश सांगितला. आंदोलनात उदय नारकर, आनंद विंगकर, शरद नावरे, एकनाथ पाटील, डॉ. नितीन शिंदे, गोविंद काजरेकर, नामदेव माळी, कवी गोविंद पाटील, रफीक सूरज, श्यामसुंदर मिरजकर, महेश कराडकर, प्राचार्य प्रवीण चौगले, प्रा. शशिकांत चौधरी डॉ. गिरीश मोरे, प्रा. टी. के सरगर, नाटककार सुनील माने, जयसिंग पाटील, डॉ. जयश्री राजीव चव्हाण, आर वाय पाटील, प्रमोद तौंदकर, एस के पाटील, राजेश वरक, दिलीप माने, उमेश देसाई, शरद आजगेकर, सीमा पाटील, सी. एम. गायकवाड, प्रा. प्रकाश नाईक, श्रीधर चैतन्य शिक्षक नेते भरत रसाळे शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य अभिषेक मिठारी, श्वेता परुळेकर, रशिया पडळकर, बन्सी सातपुते, रावसाहेब पुजारी, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, प्रा सुनील शिंत्रे, युवराज कदम, राजाराम देसाई, अभय पुजारी आदीॅचा सहभाग होता