महिला नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील शेतकरी बनतील - शौमिका महाडिक
schedule24 Jul 26 person by visibility 35 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आज प्रत्येक महिला काही ना काही कारणाने शेतीशी निगडीत आहेत. ग्रामीण भागात दूध डेअरीला घालणे, गुरांना चारा देणे, लागवड, पासून ते भाजीविक्रीचे काम महिला करतात. शेतकरी महिला प्रमाणपत्रामुळे या महिलांना कर्ज तसेच सरकरी योजनांचा लाभ मिळेल. राज्यभरातील हजारो महिला आता खऱ्या अर्थाने शेतकरी म्हणून ओळख सांगतील. ग्रामीण आणि शहरी भागातील महिला नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील शेतकरी बनतील असा विश्वास शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी भाजप कार्यालय येथे भाजपा महिला मोर्चातर्फे आयोजित कृषी माऊली सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी टेरेस गार्डन तज्ज्ञ तृप्ती देशपांडे या प्रमुख वक्त्या होत्या. प्रदेश सचिव स्वाती पाटील, जिल्हाध्यक्ष माधुरी नकाते, मेघाराणी जाधव, अश्वीनी कबुडगे, गायत्री राऊत, सुशिला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तृप्ती देशपांडे यांनी विषमुक्त शेती, गच्चीवरील शेतीतून काय पिकवता येते याबाबत मार्गदर्शन केले.देशी बियाण्यांचे जतन करणे आता काळाची गरज बनली आहे.त्यामुळे प्रत्येक महिलेने आपली बीज बँक बनवली पाहिजे असे आवाहन यावेळी देशपांडे यांनी केले.
शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १५० महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात कृषी साहीत्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका नेहा तेंडुलकर, राजनंदा महाडीक, बानु नदाफ, अर्चना कोराणे, पुर्वा राणे, दिपा ठाणेकर, पल्लवी देसाई, श्रद्धा जाधव उपस्थित होत्या.