भारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापनदिन साजरा,
schedule24 Jul 26 person by visibility 95 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय मजदूर संघाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय मजदूर संघ कार्यालय, कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मेंगाळे म्हणाले "भारतीय मजदूर संघाची ७२ वर्षांची वाटचाल ही केवळ वेतनवाढीसाठीचा संघर्ष नसून राष्ट्रनिर्मितीमध्ये कामगारांना सन्मानाचे स्थान मिळवून देणारा प्रवास आहे. आज उद्योग क्षेत्रात कंत्राटीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता, चार नवीन कामगार संहितांमुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. 'सुधारणा स्वीकारू, पण कामगारांच्या हक्कांच्या किंमतीवर नाही' ही आमची स्पष्ट भूमिका आहे. किमान वेतन नव्हे, तर जीवननिर्वाह वेतन हा कामगारांचा अधिकार आहे.’