Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर देशात द्वितीय स्थानावरभारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापनदिन  साजरा,शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारी महिला नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील शेतकरी बनतील - शौमिका महाडिक४१० दूध संस्थेविषयी शौमिका महाडिकांचे प्रेम हे पुतना मावशीचे, सभासदांचे पत्रकविद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात वंचित - डाव्या आघाडीची रॅलीकोल्हापुरात आंदोलनांचे जंतर-मंतर ! भाजप - काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर, प्रचंड घोषणाबाजी ! !गडहिंग्लजमधील आरटीई २५ टक्के प्रवेशातील  अनियमिततेची चौकशी; त्रिसदस्यीय समिती नियुक्तखोट्याला संरक्षण द्यायच्या नावाखाली नेत्यांनी खऱ्यांवर अन्याय करू नये : सुधीर मसवेकर

जाहिरात

 

४१० दूध संस्थेविषयी शौमिका महाडिकांचे प्रेम हे पुतना मावशीचे, सभासदांचे पत्रक

schedule24 Jul 26 person by visibility 39 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘प्रशासनाने नोटिसा काढलेल्या ४१० दूध संस्थाविषयी गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक या कोरडी सहानुभूती दाखवित आहेत. त्यासंस्थेविषयी त्यांचे प्रेम हे पुतना मावशीचे आहे असा टोला संबंधित दूध संस्थांनी लगाविला आहे. पत्रकात म्हटले आहे, ‘शौमिका महाडिक व अन्य काही जणांनी ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात जाऊन ४१० दूध संस्थाविषयी कोरडी सहानुभूती दाखविल आहे. त्यांच्या या भूमिकेने आम्ही आश्चर्यचकित झालो. कारण आमचा मतदानाचा अधिकार काढून ब वर्ग सभासद करण्याचा घाट दिसतो. यावरुन त्यांच्या मनात नेमके काय आहे ? याची जाणीव झाली.  महाडिक या गोकुळ दूध संघाच्या माजी संचालिका आहेत. त्यांनी संस्था नोंदणीची प्रक्रिया माहित असायला हवी होती. या दूध संस्थांनी रितसर प्रक्रिया पूर्ण करुनही पुन्हा त्यासंबंधी प्रश्न उपस्थित करत आहेत. यावरुन त्यांना, या संस्थांचा मतदानाचा अधिकार घालवायचा आहे. मात्र सभासद ते सहन करणार नाहीत असे पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes