Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर देशात द्वितीय स्थानावरभारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापनदिन  साजरा,शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारी महिला नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील शेतकरी बनतील - शौमिका महाडिक४१० दूध संस्थेविषयी शौमिका महाडिकांचे प्रेम हे पुतना मावशीचे, सभासदांचे पत्रकविद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात वंचित - डाव्या आघाडीची रॅलीकोल्हापुरात आंदोलनांचे जंतर-मंतर ! भाजप - काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर, प्रचंड घोषणाबाजी ! !गडहिंग्लजमधील आरटीई २५ टक्के प्रवेशातील  अनियमिततेची चौकशी; त्रिसदस्यीय समिती नियुक्तखोट्याला संरक्षण द्यायच्या नावाखाली नेत्यांनी खऱ्यांवर अन्याय करू नये : सुधीर मसवेकर

जाहिरात

 

कोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!

schedule24 Jul 26 person by visibility 42 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नीट पेपर फुटीप्रकरणी सरकारला जाब विचारण्यासाठी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील लेखक, कवी, प्राध्यापक  व शिक्षक मंडळी रस्त्यावर उतरत आहेत. ‘चला एकत्र येऊ या. जंतरमंतरवर लढणाऱ्या तरुणाईचे मनोबल वाढवण्यासाठी,  लढ्याचा भाग बनण्यासाठी’अशी साद घालत ही मंडळी शनिवारी (२५ जुलै २०२६)धरणे आंदोलन करणार आहेत. टाऊन हॉल नजीकच्या राजर्षी शाहू समाधी स्थळ येथे दुपारी दोन वाजता हे आंदोलन होणार आहे.  

‘भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशाच्या भवितव्याच्यादृष्टीने ही बाब खूपच चिंताजनक आहे. गेल्या दहा बारा वर्षात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या सरकारने सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या लेखक, कवी, कलावंत, शिक्षक, कार्यकर्ते, विद्यार्थी या साऱ्यांचाच आवाज दाबला आहे. त्यांची मुस्कटदाबी केली आहे. काहींना तर तुरुंगात सडवले आहे. त्यांच्या सृजनशीलतेचाच गळा दाबला जात आहे. जंतरमंतरवर देशभरातून उत्स्फुर्तपणे जमलेली ही तरुणाई म्हणजे सरकारच्या दडपशाहीला दिलेली प्रतिक्रिया आहे. चला तर मग तिचे मनोबल वाढवण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्थळावर एकत्र येऊया. तरुणाईचा हा आवाज अधिक बुलंद करूया...’या विचाराने ही सारी मंडळी शनिवारी एकवटत आहेत.

या आंदोलनात डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. माया पंडित, कॉम्रेड धनाजी गुरव, संपत देसाई, डॉ. मोहन पाटील, उदय नारकर, आनंद विंगकर, एकनाथ पाटील, कृष्णात खोत, डॉ. नितीन शिंदे, संजय बनसोडे,  कृष्णात स्वाती, श्रीधर चैतन्य, अनमोल कोठडीया, प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, गोविंद काजरेकर, नामदेव माळी, कवी गोविंद पाटील, रफीक सूरज, श्यामसुंदर मिरजकर, महेश कराडकर, किरण गुरव, जयसिंग पाटील, सुभाष कोरे, चंद्रशेखर कांबळे, संतोष जगताप,  पाटलोबा पाटील, दि.बा. पाटील, डॉ. राजीव चव्हाण, महेश पेडणेकर, राहुल कदम,  चंद्रकांत बाबर, साहिल कबीर, सुधाकर सावंत, राहुल पवार, उमेश देसाई, संभाजी बापट, मनोज रणदिवे, प्रसाद पाटील, गौतम वर्धन, रवी राजमाने, अभिजित पाटील, बाळासाहेब कांबळे, अ‍ॅड. कृष्णा पाटील, कविता ननावरे, सुप्रिया आवरे, धनाजी घोरपडे, रमजान मुल्ला, शरद आजगेकर, विष्णू पावले, रंगा कांबळे, धर्मवीर पाटील, रविंद्र गुरव, विष्णू पावले, विक्रम वागरे,विक्रम राजवर्धन, कृष्णा भारतीय, प्रशांत नागावकर, डॉ नवनाथ शिंदे, विजय कांबळे, राजेंद्र कांबळे, डी के पाटील आदी सहभागी होणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes