Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफ

जाहिरात

 

पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत वाद, शिवसेना ठाकरे पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर हल्लाबोल ! ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई ! !

schedule15 Oct 26 person by visibility 125 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे मोठे नेते आहेत. शरद पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे अशी मोठी नावे आहेत. मात्र पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख- जाधव यांच्या प्रचार पत्रक व बोर्डावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो कशासाठी वापरत आहेत ? मशाल चिन्ह का छापता ? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने शिवसेनेसोबत बेईमानी करू नये. राष्ट्रवादीच्या सूज्ञ नेत्यांना हा प्रकार शोभणारा नाही. राष्ट्रवादीकडून मतदारांची फसवणूक सुरू आहे. फोटो वापरायचे बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करू.’असा इशारा शिवसेनेचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला.

पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार नगरसेवक सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ गुरुवारी पंधरा ऑक्टोबर २०२६ कोल्हापुरात प्रचार मेळावा झाला. पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून हर्षदा देशमुख जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे. तर शिवसेनेने सुनील मोदी यांना मैदानात उतरविले आहे. मोदी यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते मैदानात उतरले आहेत. उमेदवार सुनील मोदी यांनी, निवडणूक लढविण्यामागील भूमिका स्पष्ट केली. दरम्यान ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉल येथे आयोजित मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांवरही निशाणा साधला.’

माजी खासदार राऊत म्हणाले,‘केंद्र आणि राज्यातील भ्रष्ट व मुजोर भाजप सरकारला सुरुंग लावण्यासाठी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्वाची आहे. महायुती सरकारच्या कामगिरीवर शेतकरी, पदवीधर, विद्यार्थी असा कुठलाच घटक खुश नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या सरकारच्या विरोधात रोष असून पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिवसेनेला नक्की यश मिळेल.’

उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी, ‘पुणे पदवीधर मतदासंघात शिवसेना ठाकरे पक्ष ज्यांच्यासोबत त्यांचा विजय असे आतापर्यत समीकरण होते. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार मैदानात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदवीधर तरुणांच्या न्याय हक्कासाठी लढणारा सक्षम उमेदवार म्हणून सुनील मोदी यांना उमेदवारी दिली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांन सजग राहून शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करावे.’याप्रसंगी आमदार सुनील प्रभू,  माजी आमदार सत्यजीत पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे आदींची भाषणे झाली. शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख विराज पाटील, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, नवेज मुल्ला राज्य संघटक, उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत, शहर संघटिका रीमा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना शहरप्रमुख मंजीत माने, विशाल देवकुळे यांनी स्वागत केले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes