Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!सन्मानजनक निधी द्या, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठकगोकुळमध्ये कोणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीच संचालक होतीलगोकुळवर कब्जा करण्यासाठी महायुती सरकारचे षडयंत्र, नऊ नोव्हेंबरला कोल्हापूरात संघर्ष मोर्चा -आमदार सतेज पाटीलशिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित, शालेय शिक्षण क्रीडा विभागची कारवाईप्राचार्य जी.पी. माळी यांच्या काट्यावरची फुलं या आत्मकथनाचा बारा नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ आमदार कौस्तुभ गावडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! जुनी पेन्शन योजना -सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नाकडे  वेधले लक्ष ! !सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट -सेट आवश्यक करवीर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभपुणे-बेंगलोर महामार्गावर ३२ तासांपासून स्वाभिमानीचा एल्गार, किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांचा ठिय्या

जाहिरात

 

संस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, चार शिक्षिकांसह लिपिकाविरोधात पोलिसात गुन्हा

schedule08 Jul 26 person by visibility 525 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षकांच्या वेतनासाठीची आवश्यक शालार्थ आयडीसाठी बनावट नियुक्तीपत्रे देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शाहूपुरी  पोलिस स्टेशनमध्ये,  लिपिक उमेश कल्लाप्पा शिंगे वडणगे, शिक्षिका प्रमिला नामदेव चव्हाण सासवड, उज्ज्वला महादेव चांदगुडे सासवड, प्रियांका शंकर पाटील सासवड आणि सरवतजहान तौफिक बागवाण सासवड या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी  लिपिक उमेश शिंगेना अटक केली आहे. सरकारची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सहसचिवांनी या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 यासंदर्भात पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, ११ जुलै २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुरंदर हायस्कूल  व ज्युनिअर कॉलेज येथे. पुरंदर येथील या ज्युनिअर कॉलेजमध्ये तासिका तत्वावर काम करणाऱ्या  शिक्षकांना आयडी कार्ड काढण्यासाठी नियुक्तीपत्रे देऊ असे सांगितले होते. त्यांनी वरिष्ठांच्या परस्पर व  प्राचार्यांना खोटे सांगून संस्थेचे बनावट नियुकती आदेश बनविले. ११ जुलै २०२३ रोजी संस्थेचे लेटरहेड, शिक्के वापरुन शिक्षिका प्रमिला नामदेव चव्हाण सासवड, उज्ज्वला महादेव चांदगुडे सासवड, प्रियांका शंकर पाटील सासवड आणि सरवतजहान तौफिक बागवाण सासवड यांना नियुक्तीपत्रे बनवून दिली.  खोटे जावक क्रमांकाचा उल्लेख करत संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचा बनावठ ठराव तयार केला. लिपिक शिंगेनी तयार केलेली बनावट नियुक्तीपत्रे, ठराव शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथे सादर केली. तसेच संस्थेचे ठराव दाखवत शालार्थ आयडी बनवून घेतले. हा प्रकार समोर आल्यानंतर संस्थेच्यावतीने लिपिकासह चार शिक्षिकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  झाला.  पोलिसांनी, या प्रकरणी लिपिक शिंगेना अटक केली आहे. पोलिसांनी शिंगेना कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे.विवेकानंद शिक्षण संस्थेनेही शिंगेना सेवेतून निलंबित केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes