डॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मान
schedule14 Sep 26 person by visibility 59 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भारतातील सर्वोच्च न्यूरो संस्था असलेल्या श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी (एससीटीआयएमसीटी) त्रिवेंद्रमकडून न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना सर्वोच्च "अॅवार्ड ऑफ एक्सलन्स" प्रदान करण्यात आला. न्यूरोसर्जरी आणि रुग्णसेवेतील अग्रगण्य नाविन्य, उद्योजकीय दृष्टी आणि ट्रान्सलेशनल उत्कृष्टत यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. एससीटीआयएमसीटी संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत येणारी एकमेव केंद्र सरकारी संस्था आहे.आणि हृदय व मेंदूसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे स्वदेशातच विकसित करणारी भारतातील एकमेव संस्था आहे.या पुरस्काराविषयी बोलताना डॉ. मारजक्के म्हणाले, “हा वैयक्तिक सन्मान नाही. हा माझ्या आवड, चिकाटी, सातत्य, जिद्द, रुग्णसेवेतील करुणा, माझ्या संपूर्ण टीमच्या कष्टाचा संकल्पनेचा आहे. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि पाठबळ हेच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे."